महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाला वेगळे वळण: अपक्ष, घटक पक्ष येणार जोमात महायुती, महाविकास आघाडी जाणार कोमात
विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती व महाआघाडी यांच्यामध्ये चाललेल्या रस्सीखेच स्पर्धेत ज्यांच्या बाजूने घटक पक्ष व अपक्ष असतील त्यांचं पारडं जड राहण्याची शक्यता आहे येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये आपल्याला हे पाहायला मिळू शकतं. बहुमताचा आकडा गाठत असताना महायुती व महाआघाडी यांची मोठी रस्सीखेच होणार आहे यामध्ये महत्त्व येणार आहे ते म्हणजे घटक पक्ष व अपक्ष निवडणूक लढणाऱ्या व त्यामध्ये जिंकणाऱ्या आमदारांना.
145 ची मॅजिकल फिगर गाठण्यासाठी दोन्हीही पक्षांमध्ये जबरदस्त चुरस लागताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि यामध्ये सर्वात जास्त भाव मिळणार आहे तो म्हणजे निवडून येणारे घटक पक्षाचे आमदार आणि अपक्ष आमदार. अपक्ष व घटक पक्षाचे आमदार ज्या पक्षांमध्ये जातील त्या पक्षांना
145 ची मॅजिक फिगर गाठणे शक्य होणार आहे पण त्या बदल्यात या आमदारांना त्यांना हवी असलेली रक्कम द्यावी लागेल की काय असे भाकीत वर्तवले जात आहे अपक्ष आमदार देखील याच मतावर आहेत की या निवडणुकीत आमचा झालेला खर्च निघाला पाहिजे आणि यामुळे महायुती व महाआघाडीचे प्रमुख त्यांना मोठी रक्कम देऊ शकतात
तसेच या अपक्ष आमदारांना व घटक पक्षांच्या निवडून आलेल्या आमदारांना मोठी मंत्रिपद सुद्धा मिळू शकतात आणि या गोष्टीमुळे महायुती व महाआघाडी मधील निवडून आलेल्या काही आमदारांना नाराजगी पदरात पाडून घ्यावी लागणार आहे. महायुती व महाआघाडी यांच्यामध्ये चुरस लागल्यास व 145 चा मॅजिकल फिगर न गाठू शकल्यास निवडून येणार अपक्ष आमदार व घटक पक्षाचे आमदार यांना खूप महत्त्व येण्याचे शक्यता वर्तवली जात आहे