असा करा महाराष्ट्र शासनाच्या ‘लाडका भाऊ योजने’ साठी अर्ज
माननीय मुख्यमंत्री यांनी पंढरपूर येथे लाडकी बहीण योजनेप्रमाणेच आपल्या लाडक्या भावांसाठी केली मोठी घोषणा
माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे लाडका भाऊ योजना या योजनेची घोषणा केली आहे तर या योजनेअंतर्गत आपल्या लाडक्या भावांना दरमहा 6000 रुपये दहा हजार रुपये या प्रमाणात मानधन मिळणार आहे तर जे विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असतील त्यांना सहा हजार रुपये डिप्लोमा उत्तीर्ण असतील त्यांना आठ हजार रुपये तसेच डिग्री पास असलेल्या तरुणांना दहा हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.
तरुणांना कारखान्यांमध्ये अप्रेन्टीशिप करण्यासाठी पैसे देणार आहे या योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगारी वरती उपाय काढला गेला आहे असे मुख्यमंत्री यांनी पंढरपूर येथे सांगितले.
परंतु या योजनेचा लाभ सर्वच विद्यार्थ्यांना मिळणार नसून जे विद्यार्थी अप्रेन्टीशिप करणार आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेसाठी अर्ज महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून करता येणार आहे.
https://rojgar.mahaswayam.gov.in इच्छुक उमेदवारांनी वरती दिलेल्या लिंक वरती क्लिक करून कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अर्ज नोंदणी करता करणे आवश्यक आहे.
लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी आवश्यक पात्रता:
1. उमेदवाराचे वय: 18 वर्ष ते 35 वर्ष
2. शैक्षणिक पात्रता: बारावी पास, आय टी आय, पदवी, पदव्यूत्तर
3. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा
4. उमेदवाराची आधार नोंदणी केलेली असावी
5. उमेदवाराचे बँक खाते आधार कार्ड सोबत जोडलेले असावे
6. आयुक्तालयाच्या संकेतस्थळावरती रोजगार कौशल्य व उद्योजकता या ठिकाणी रोजगार नोंदणी क्रमांक आवश्यक आहे
शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत
महाराष्ट्र शासनाच्या लाडका भाऊ योजनेसाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर सहा महिन्याच्या ट्रेनिंगचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे त्यानंतर तुम्हाला पूर्ण पगारी नोकरी मिळू शकते
या योजनेअंतर्गत उमेदवाराने अप्रेंटशिप सुरू केली असता त्या उमेदवाराला महिन्यातून दहा दिवसापेक्षा जास्त सुट्टी मिळू शकत नाही अन्यथा त्याचे पूर्ण महिन्याचे वेतन कापले जाऊ शकते
शैक्षणिक पात्रता मासिक वेतन
1. 12 वी पास 6000
2. आय ती आय 8000
3. पदवी/ पदव्युत्तर 10000