ही दोन चिन्हे गोठविल्यामुळे महाविकास आघाडीला होणार फायदा

ही दोन चिन्हे गोठविल्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेना आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांना होणार फायदा:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षांमध्ये फूट पाडून अजित अजित पवारांनी 40 आमदारांसह राष्ट्रवादी पक्ष हे नाव आणि आणि घड्याळ हे चिन्ह घेऊन त्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचे 40 आमदारासह अजित पवार यांनी घड्याळाचे चिन्ह निवडणूक आयोग यांच्याकडून मिळवले होते त्याचबरोबर शिवसेनेतही फूट पडली होती. व शिवसेनेचे मूळचे चिन्ह धनुष्यबाण व शिवसेनेचे पक्षाचे नाव एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडून मिळवले होते पण निवडणूक आयोगाने शरदचंद्रजी पवार आणि उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा दिलेला आहे.

शिवसेनेचे अनिल देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की निवडणुकीच्या मशालीच्या चिन्हाबाबत जो संभ्रम निर्माण झाला होता म्हणजेच मशालीचे चिन्ह निवडणुकीचे निवडणुकीच्या ईव्हीएम मशीन वर आईस्क्रीम कोण किंवा पेटणारी काडी पेटलेली काडी याप्रमाणे दिसत होते व त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत होता पण हे चिन्ह आता व्यवस्थितपणे शिवसेना ज्या पद्धतीने ते चिन्ह लोक निवडणूक आयोगाकडे देईल त्याप्रमाणे ते चिन्ह आता ईव्हीएम मशीन वर छापले जाणार आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांना आता लोकांकडून कंपन्यांकडून निधी मिळवता अधिकृत निधी मिळवता येणार आहे याबाबत निवडणूक आयोगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला मोठा दिलासा दिलेला आहे.

शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह असून ईव्हीएम मशीन वर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ट्रंपेट याचे मराठीत अनुवाद तुतारी असे करण्यात आले होते व त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता या गोष्टीचा फटका शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांना एका मतदार संघामध्ये झालेला होता तुतारी या चिन्हाला 34 हजार मतदान पडल्यामुळे त्या मतदारसंघातून शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचा उमेदवार निवडून येऊ शकला नाही पण आता निवडणूक आयोगाने शरदचंद्रजी पवार यांच्या गटाला मोठा दिलासा देऊन ते चिन्ह तुतारीचे चिन्ह कायमचे गोठवून टाकलेले आहे आणि शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांचा तुतारी वाजवणारा हे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह अबाधित ठेवून त्यावर निवडणूक लढण्यास हरकत नसल्याचे जाहीर केल्या आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी पत्रकारांना दिली.

ही चिन्ह कोठवल्यामुळे आणि शिवसेनेला निधी मिळाल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा मिळणार असल्याचे चिन्ह दिसत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *